खालापुर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने महेंद्र एक्सयुव्ही कार (एमएच-14,इवाय-9489) महामार्गालगत लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील असीम कादीर शेख (वय 30), जुनैद अन्सारी (वय 35), मुस्ताफा शेख (वय 30), शाब्राज शेख (वय 35) आणि झहीर शेख (वय 30) जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या असीम कादीर शेख आणि जुनैद अन्सारी यांनी पुढीलसाठी पनवेल येथील खाजगी व कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper