Breaking News

यंदा मान्सून सामान्य राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
या वर्षीच्या मान्सून अंदाजाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे.
हवामान अंदाज वर्तवणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सन 2022साठी प्राथमिक मान्सून अंदाज जारी केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असून तो सरासरीच्या 97 ते 104 टक्के असेल.
पूर्वानुमानानुसार सुरुवातीच्या काळात मान्सूनची स्थिती चांगली असेल. या काळात भरपूर पाऊस पडेल. त्याचबरोबर हा हंगामी काळ शेतकर्‍यांसाठी अनुकूल राहील, असे ‘स्कायमेट’चे उपाध्यक्ष आणि मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. महेश पलावत यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पाहायला मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्यात कमी पाऊस पडू शकतो, परंतु मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे, असे डॉ. पलावत म्हणाले. एप्रिल महिन्यात ‘स्कायमेट’कडून मान्सूनबाबतचा सविस्तर अंदाज वर्तविला जाणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply