Breaking News

शिवजयंतीनिमित्त उलगडला शिवरायांच्या शिलेदारांचा जीवनपट

पनवेल भाजप युवा मोर्चाचा उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने अध्यक्ष रोहित जगताप यांनी शिवरायांच्या शिलेदारांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उलगडला. या शूरवीरांचे कार्यफलक शहरातील वडाळे तलाव परिसरातील रस्त्यावर लावून नागरिकांना माहिती देण्यात आली.

भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबविला. यामध्ये शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, शिवा काशिद, कान्होजी जेधे, हिरोजी इंदुलकर, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे, जिवा महाल, फिरंगोजी नरसाळा, मुरारबाजी देशपांडे आणि गुरूवर्य दादोजी कोंडदेव यांचे जीवनकार्य मांडण्यात आले.

नव्या पिढीला या स्वराज्याच्या शिलेदारांचे शौर्य व त्याग माहीत व्हावा आणि त्यापासून काहीतरी करण्याची तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply