Breaking News

रोह्यात 44 रुग्णांची वाढ

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (दि. 17) एका दिवसात 44 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रोह्यात  खळबळ उडाली आहे. ही वाढती आकडेवारी तालुक्याची चिंता वाढवणारी ठरली आहे.

रोहा तालुक्यात 11 ते 17 एप्रीलपर्यंत एकूण 242 कोरोना रुग्ण आढळलेे असून, या कालावधीत 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याने रोहा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण अधिक वाढला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्या पध्दतीने शासन उपाययोजना करीत आहे, त्याच पध्दतीने रोहा शहरात शासकिय यंत्रणा व पोलीस संयुक्तरीत्या काम करीत आहेत. शहरात विनाकारण फिरणारे, विना मास्क फिरणारे तसेच गर्दी करणार्‍या नागरिकांवर कारवाई कारवाई करण्यात येत आहे.

रोहा तालुक्यात शनिवारी 44 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 3174 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 2733 एवढी झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 96 करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. रोहा तालुक्यात सध्या345 कोरोना सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

श्रीवर्धनमध्ये कोरोना वाढतोय

श्रीवर्धन : प्रतिनिधी 

मागील चार दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 16 एप्रिल रोजी तालुक्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते तर रविवारी (दि. 18) नवीन अकरा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील सातजण कोरनावर मात करुन घरी परतले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी श्रीवर्धनमध्येदेखील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून मास्क न लावणे, लावलेला असेल तरी तो  हनुवटीवर असणे, विनाकारण बाहेर फिरणे इत्यादी प्रकार अद्यापही सुरू आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई केली आहे. जीवना बंदरसारख्या भागांमध्ये पोलिसांची गस्त होत नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक मास्क लावताना दिसून येत नाहीत.

श्रीवर्धन तालुक्यात ग्रामीण भागापेक्षा शहरातच रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण सहाशे रुग्ण आढळले असून, त्यापैकी 86 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला तर बरे झालेल्यांची संख्या 491 आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply