Breaking News

सुकापूरमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्याचा सर्वांगीन विकास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यानुसार सुकापूर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे मंजुर झाली आहे. या विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 23) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून सुकापूर येथील युगांतक सोसायटी येथील गणेश मंदिर ते प्रेरणा सोसायटीपर्यंत्त आणि कार्तिकेय सोसायटी ते रचना सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम मंजुर झाले आहे. 18 लाख रुपये निधी खर्च करून तयार करण्यात येणार्‍या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कार्यकर्ता जागृत असला तर आपल्या परिसराचा विकास निश्चीत होतो, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलुराम केणी, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, पाली देवद पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य महेश पटील, गाव अध्यक्षराजेश पाटील, सदस्य चेतन केणी, सदस्या अनिता पाटील, पूनम भगत, प्राची जाधव, कविता पोपेटा, ज्योती केणी, ज्येष्ठ नेते हनुमंत खुटले, आत्माराम पाटील, पांडुरंग केणी, अनंता म्हस्कर, डॉ. कृष्णा देसाई, युवा नेते प्रमोद भगत, शाम सणस, अकबर सोलकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply