खोपोली : प्रतिनिधी
नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते.
सरकारी निमसरकारी कर्मचार्यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर असल्यामुळे नेहमी गजबजलेला खालापूर तहसील परिसर शांत होता.