Breaking News

नेरळ मानिवली येथे घरफोडी

सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख चोरले

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील मानिवली येथे घरफोडी होवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण चार लाखाची चोरी झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा तपास पोलीस करत आहेत.

अधिक वृत्त असे, महेंद्र तुकाराम गवळी हे आपल्या सासरवाडीला नेवाळी येथे (दि. 28)श्री सत्यनारायण पूजेसाठी गेले होते. या वेळी बंद घराच्या पडवीमधून मधून वाट काढीत घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. दरम्यान साधारण चार लाखाच्या घरफोडी प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान महेंद्र  गवळी हे आपल्या सासुरवाडी येथे गेले होते, तेव्हा साडे आठ वाजता त्यांचा पुतण्या हा त्यांच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडून घरात गेला असता घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ महेंद्र गवळी यांना दूरध्वनीवरून चोरी झाल्याची माहिती दिली. घराच्या पडवीच्या पत्र्यावर चढून किंवा उघड्या खिडकीतून प्रवेश करीत चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मध्ये असलेली दोन लाकडी कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत माहिती मिळताच नेवाळी येथे पोहचलेले गवळी कुटुंबीय मानिवली येथील घरी पोचले. घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याची गंठण, कानातील कर्णफुले आणि सोन्याचा हार असा सव्वा तीन लाखाचा ऐवज तसेच कपाटात असलेली 90 हजाराची रक्कम देखील चोरट्यांनी लंपास केली आहे.

अधिक तपास नेरळ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक एस.आर.काळे हे करीत आहेत.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply