Breaking News

पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असल्याने गुरुवारी (दि. 9) पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रचार दौरा करून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील खुटारी, रोहिंजण, किरवली, धानसर, धरणा, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले, तळोजे मजकूर, कोयनावेळे, घोट, पडघे, कानपोली, वलप, पाले बुद्रुक, कोळवाडी, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई, आकुर्ली, हरिग्राम-केवाळे, विहिघर, सुकापूर, देवद, उसर्ली आणि विचुंबे गावात प्रचार पत्रकांचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती मतदारांना देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचारावेळी भाजपचे मावळ लोकसभा निरीक्षक सुनील कर्जतकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, महादेव मधे, भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य अमित जाधव, माजी पं.स. माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य चेतन केणी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजप नेते प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, पडघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पाटील, विनोद पाटील, दशरथ म्हात्रे, शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिनेश खानावकर, संतोष आगलावे, राजेश पाटील, सुनील पाटील, विश्वजीत पाटील, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, राम पाटील, राजेश काथारा, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, प्रमोद भगत, पिंटू काथारा, मोतीराम काथारा, सुभाष भोईर, के.के. कडव, अशोक गडगे, रूपेश फुलोरे, भास्कर फुलोरे, हरिदास फुलोरे, नंदू म्हात्रे, पांडुरंग पाटील, रविकांत म्हात्रे, सचिन पाटील, महादेव गडगे, नितेश पाटील, महेश पाटील, नाथा आगलावे, दीपक उलवेकर, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, बुधाजी मोरावकर, महेश पाटील, निलेश वाघमारे, वामनशेठ वाघमारे, धनंजय म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, रमेश पाटील, धनंजय पाटील, आनंदबुवा पाटील, महादू शेळके, रमेश काकडे, प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, किशोर सुरते, आलुराम केणी, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, …

Leave a Reply