प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम
कळंबोली ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका प्रभाग समिती ब सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी कळंबोलीत मनपा प्रभाग क्र.7मधील सोसायट्यांत जाऊन हळदीकुंकू समारंभ साजरा केला. याद्वारे महिलांना सौभाग्याचे वाण देण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, उपाध्यक्ष प्रियंका पवार, सरचिटणीस दुर्गा सहानी, युवा उपाध्यक्ष कविता गुजर, उत्तर भारतीय महिला शहर अध्यक्ष मयुरी पेरवी, कार्यकर्त्या सरिता बसोने, राणी राणापूर, लैला शेख, सुलभा साखरे, पुष्पा पंचाक्षरी, नीता अधिकारी, श्वेता नगराळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ता आणि रहिवासी महिला उपस्थित होत्या, अशी माहिती भाजप कळंबोली कार्यालयीन चिटणीस जगदिश खंडेलवाल यांनी दिली.