Breaking News

नेत्रा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

खारघर ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या नेत्रा पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मोफत महानोंदणी अभियान खारघर सेक्टर 19मधील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होतेे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत नेत्रा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्ष खारघरच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोफत महानोंदणी अभियानात 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आधार कार्ड, आधार कार्डमध्ये अपडेट तसेच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढून देण्यात आले. सुमारे 300हून अधिक नागरिकांना या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरास भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंडाळकर, संदीप एकबोटे, अर्चना बागल, लता कातोरे, गोपाल राजपूत, निरंजन पाटील, खारघर पोस्ट ऑफिसचे सचिन बडे, मल्लिका बिस्वास यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका नेत्रा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply