कर्जत : बातमीदार
समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय 26) यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या वतीने कर्जत येथे बुधवारी (दि. 23) या हत्येचा निषेध करण्यात आला.
हर्षा यांनी कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे केले होते. त्यात हजारो युवकांनी भाग घेतला होता. त्यामुळे त्याची दिवसाढवळ्या भर रस्त्यात क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषधार्थ कर्जत येथे बुधवारी बजरंग दलाकडून निदर्शने करण्यात आली. बजरंग दलाच्या प्रतिनिधींनी कर्जत तहसील कार्यालयात जाऊन
तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन सादर केले. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे, प्रखंड मंत्री विशाल जोशी, अध्यक्ष विनायक उपाध्ये, धर्मप्रसार प्रमुख दिनेश रणदिवे, अनंत हजारे, सचिन ठाकूर, रमेश नाईक, गायत्री परांजपे, दिनेश कडू, संदेश काळभोर, मनोज लाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.