पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, (कोमसाप) नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमानेे शनिवारी (दि. 26) दुपारी 12 वाजता चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.
मराठी भाषेच्या जडणघडणीत प्रसिध्द साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात विविध साहित्यिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने शैक्षणिक, भाषिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषद, नवीन पनवेल शाखा तसेेच चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानेे मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.
हा कार्यक्रम चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती घरत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या उपस्थितीत शनिवारी मराठी भाषा दिन साजरा होणार आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …