Breaking News

कॅन्सर रुग्णांसाठी कमी खर्चात केमोथेरपी

 रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या केंद्राचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी

कर्करोगा या असाध्य खर्चिक आजारासाठी पनवेलकरांना मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी आता धाव घ्यावी लागणार नाही. पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अशा परवडणार्‍या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 25) डॉ. सलील पाटकर यांच्या ऑन्कुरा ऑन्कॉलॉजी केअर क्लिनिकमध्ये करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अशा परवडणार्‍या या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन महापालिका सभागृह नेते व रोटरी सदस्य परेश ठाकूर यांच्या हस्ते डीआरएफसी माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे व भावी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलच्या लाईन आळीत डॉ. सलील पाटकर यांच्या ऑन्कुरा ऑन्कॉलॉजी केअर क्लिनिकमध्ये करण्यात आले.

कॅन्सर या असाध्य खर्चिक आजारावर उपचारासाठी पनवेलकरांना मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असे, परंतु आता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून केमोथेरपीसाठी चार बेड हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रोटरी क्लबचे तसेच डॉ. सलील पाटकर यांचे विशेष आभार मानले आणि पनवेलसह रायगडातील कर्करोग रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अतिशय आवश्यक अशी ही अल्प दरातील केमोथेरपीची रुग्णसेवा असून उत्तर रायगड जिल्ह्यातील हे एकमेव केंद्र असल्याचे रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक राजू सोनी, डॉ. अरुणकुमार भगत तसेच डॉ. विजय पाटकर, डॉ. लीलाधर पाटकर, डॉ. शैला पाटकर, डॉ. क्षितिजा पाटकर, डॉ.  संजीवनी गुणे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, सचिव संतोष घोडींदे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. आमोद दिवेकर, खजिनदार शैलेश पोटे, रोटरीचे भावी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रतन खरोल, सुदीप गायकवाड, विक्रम कैया, ऋषिकेश बुवा, अनिल ठकेकर, सुनील गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply