Breaking News

मुरूडमधील पूरग्रस्तांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या पाच दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी गुरुवारी (दि. 15) मुरूड तालुक्यातील उसरोली, आदाड, खारीकवाडा, खारदौडकुले येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

मुरूड तालुक्यात 11 जुलैपासून संततधार पाऊस कोसळत असून, आतापर्यंत एकूण 2092 मिलीमीटर  पाऊस झाला आहे. गेल्या पाच दिवसात तालुक्यात 871 मि.मी. इतका विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे घरातील अन्नधान्यासह कपडेलत्ते भिजून, घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुरूड तालुक्यातील उसरोली, आदाड, खारीकवाडा, खारदौडकुले गावातही पुराचे पाणी शिरले होते. तेथील पूरग्रस्तांना गुरुवारी भाजप तर्फे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, तालुका संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, माजी अध्यक्ष जयवंत अंबाजी, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश महाडिक, कृष्णा किंजले उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply