Breaking News

एसआरएल डायनॉस्टीक सेंटरतर्फे रक्त आणि नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : वार्ताहर

अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी सुरू झाले असून, या उदघाटना निमित्त आज सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला होता. त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरास अनेक गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक नामांकित डॉक्टरांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. आगामी काळातही दर महिन्याला दोनदा अशाप्रकारे मोफत शिबिर राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या संस्था, संघटना यांना अशा प्रकारे उपक्रम राबवायचे असतील त्यांनी पनवेलमधील मिडलक्लास हौसिंग सोसायटी (पत्ता : शॉप नं.8, प्लॉट नं.123, गुरुकृपा अपार्टमेंट, एमटीएनएलसमोर) येथे संपर्क साधावा असे आवाहन लॅब डायरेक्टर जसोल सुभाषचंद्र बांठीया भ्रमणध्वनी 8828882626 यांनी केले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply