Breaking News

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष

नवी मुंबई : बातमीदार – एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 12 तासाच्या आत त्वरीत एपीएमसी प्रशासनाशी चर्चा करीत पाच मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहेत. फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट या तीन ठिकाणी तपासणी कामही सुरु करण्यात आली असून पहिल्या दिवशी 500 हून अधिक जणांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली.

प्रत्येक कक्षात डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात आली असून ते कक्षात येणार्‍या प्रत्येक नागरिकांचे थर्मल स्कॅनीग करीत आहेत. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेऊन त्यांना ताप, घशात खवखव, खोकला, सर्दी, श्वसनास त्रास अशाप्रकारची लक्षणे आहेत काय याची विचारपूस करून त्यादृष्टीने तपासणी केली जात आहे. आजाराची तीव्रता बघून औषधोपचार सूचवित आहेत. या तपासणीमध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब कलेक्शन मोबाइल व्हॅनव्दारे थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात

येणार आहेत.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट ही आशियातील अत्यंत मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ असून त्याठिकाणी वाहनांची व माणसांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना घेत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याठिकाणी कोरोना नियंत्रक विशेष वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा  कक्ष सकाळी 7 ते 11 यावेळेत कार्यरत असेल तसेच फळ मार्केट व दाणा मार्केटमधील तपासणी कक्ष सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कार्यरत असणार आहे. मसाला मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट मधील कक्षही सुरू करण्यात आले आहेत.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply