Breaking News

खांदा कॉलनीमध्ये सोसायटीत फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेल खांदा कॉलनीमध्ये सोसायटीतील रहिवाश्यांसाठी फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम रविवारी (दि. 27) सिडकोच्या अग्निशमक विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मध्ये अनेक रहिवाश्यांनी सहभाग घेतला.

पनवेल महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे वित्तहानीही होत आहे. सामान्य नागरिक आग लागल्यावर घाबरून जातो. त्यामुळे दुर्घटनेची व्याप्ती वाढते म्हणून सिडकोच्या अग्निशमक विभागातर्फे फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम खांदा कॉलनीतील सेक्टर 1 मधील जी+14 या 4 टावर असलेल्या तुलसी प्रेरणा सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या वेळी स्टेशन ऑफिसर प्रतिक शिंदे व त्यांच्या टिमने  सोसायटीतील नागरिकांना आग लागल्यावर कशी काळजी घ्यावी याची प्रात्यक्षिकसह माहिती दिली. सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण साळुंके व सचिव संजीव श्रीवास्तव यांनी  प्रतीक शिंदे व त्यांच्या टिमचे आभार मानले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply