Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री हनुमान समाजसेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंचपाडा येथे व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी

(दि. 26) झाले. व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटन समारंभास कर्मयोगी संत दिलीपबाबा, भिक्खू कुलीणपुत्र वेरसभुजी स्थवीर, आर्या आम्रपाली माताजी, बाळाराम मुंडकर, रमेश मुंडकर, जितेंद्र मुंडकर, विजय मुंडकर, कमलाकर मुंडकर, शेखर मुंडकर, श्रीयश मुंडकर, निकेश मुंडकर, रूपेश मुंडकर, निलेश मुंडकर, योगेश मुंडकर, समित केणी, शशिकांत भोईर, माजी सरपंच रविकांत भोपी आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंडकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल त्यांचे कौतुक केले व या केंद्राच्या माध्यमातून मिळणार्‍या मार्गदर्शनाचा फायदा तरुणांना निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply