Breaking News

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी, सोयीसुविधांचा घेतला आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नुकतीच भेट दिली आणि तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला.
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची संकल्पना, प्रयत्न व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय साकारले असून, असंख्य रुग्ण तेथे नाममात्र दरात उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील स्वच्छता, पाणीगळती व अन्य सोयीसुविधांचा महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 2) आढावा घेतला. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर सोबत होते, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ येम्पल्ले हजर होते.
या वेळी महापौर डॉ. चौतमोल आणि सभागृह नेते ठाकूर यांनी आवश्यक त्या सूचना केल्या, तसेच या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply