Breaking News

मुरूडमध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा

मुरूड : प्रतिनिधी

मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे. ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी येथे केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण बोलत होते. मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे, याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. मधुकर वेदपाठक यांनी दीपप्रज्वल केले. डॉ. प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रीशैल भैरगुंडे यांनी प्रास्ताविक केले. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून या वेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथपाल गजानन मुनेश्वर, डॉ. मधुकर वेदपाठक, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. देविदास रौदळ, डॉ. सीमा नाहिद यांच्यासह विद्यार्थी  उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply