श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष कोकण विकास आघाडीच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ भाजप नेते कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी कोबनाक यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. नवनियुक्तीबद्दल कोबनाक यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.