Friday , September 29 2023
Breaking News

शेलू गावाच्या जंगलात सापडली दहा वर्षांची मुलगी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक 10 वर्षाची मुलगी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी सदर मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आई मारणार म्हणून नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयतेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी 8 वाजता आपल्या डोणेवाडी (जि. ठाणे) येथील घरातून पळून गेली होती. त्याची माहिती मिळताच शेलूचे पोलीस पाटील मनोज पाटील हे गावाच्या जंगलात पोहचले आणि त्यांनी त्या मुलीची माहिती काढून नेरळ पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पोलीस शिपाई वैभव बारगजे, प्रशांत मोरे यांना तातडीने तेथे पाठवले. त्यांनी त्या मुलीला नेरळ पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्या मुलीने आपल्याला आई मारणार होती, म्हणून आपण घरातून पळून गेल्याचे स्पष्ट केले.

नेरळ पोलिसांनी नंतर ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथून मुलीच्या पालकांना बोलावून घेत नंदिनीला त्यांच्या ताब्यात दिले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply