Breaking News

खांदा कॉलनीत भाजप अभेद्य!

‘महिला मोर्चाच्या कुणीही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने खांदा कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार; शिवसेनेत जाहीर प्रवेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावरही ती व्हायरल केली जात आहे, मात्र यात कोणतेही तथ्य नाही. खांदा कॉलनीत भाजप अभेद्य असून महिला मोर्चाच्या कुणीही शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला नाही, असे खांदा कॉलनी भाजप अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि सरचिटणीस आशा मुंडे यांनी सांगितले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालीआणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीत भारतीय जनता पक्ष सक्षमपणे काम करीत आहे. याशिवाय पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे आणि विकासकामे करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अशा खोडसाळ बातम्या विरोधी पक्षाचे लोक देतात. त्यांनी असले रिकामटेकडे उद्योग करण्याऐवजी जनतेची कामे करावी.

वास्तविक, शिवसेनेच्या कार्यक्रमात ज्या महिलांनी पक्षप्रवेश केला त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कधीही सदस्यत्व घेतलेले नाही अगर महिला मोर्चामध्ये कार्यकर्ता म्हणूनदेखील काम केलेले नाही. असे असताना धादांत खोटे वृत्त देऊन स्वतःची टिमकी वाजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र यामुळे भाजपला काहीएक फरक पडणार नाही. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यापुढेही जोमाने काम करून पक्षसंघटना बळकट करतील तसेच जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असतील, असेही नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि महिला मोर्चा अध्यक्ष राखी पिंपळे व सरचिटणीस आशा मुंडे यांनी म्हटले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply