Breaking News

वीर वाजेकर महाविद्यालय वन्यप्राणी दिन उत्साहात

उरण ः वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक वन्यप्राणी दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्या अनुषंगाने  वन्यप्राणी व पक्ष्यांचे पोस्टर प्रदर्शन, फुंडे-पाणजे पाणथळ येथील पक्ष्यांचे डॉ. राहुल पाटील यांचे व्हिडिओचे नियोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य पी. जी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपप्राचार्य घोरपडे यु. टी. व उपप्राचार्य डॉ. विलास महाले उपस्थित होते. या कार्यक्रमाला तू. ह. वाजेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व सर्व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रा. अमोद ठक्कर यांनी वन्यप्राणी संवर्धनाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply