विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सत्ताधार्यांवर टीका
नागपूर ः रामप्रहर वृत्त
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. मात्र आता सत्ताधारी पक्ष राज्यापालांना मुद्दाम लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करतोय, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर विमानतळ येथे ते बोलत होते.
राज्यातील राजकीय वातावरण सध्या सत्ताधिकारी महाविकास आघाडीतील मंत्री विरोधात विरोधी बाकावर असणारे भाजपमधील मंत्र्यांच्या आरोपांच्या फैरींमुळे ढवळून निघाले आहे. त्यात भर म्हणून आता, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सत्ताधारी पक्ष विनाकारण टार्गेट करतोय. शरद पवार असतील, संजय राऊत असतील, सर्वांच्या बोलण्यातून राज्यपाल हटाओ मोहीमच त्यांनी सुरू केली आहे, असे जाणवते.
राज्यपालांचा अभिभाषण सुरू असताना, सत्ताधारी पक्षाने त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. हे कितपत संध्विधानिक आहे? याचा विचार सत्ताधार्यांनी करणे गरजेचे असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. मला असं वाटतं की, राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे, ती संविधानानेच काम करते. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
संविधानिक पदावरील व्यक्ती अपमान करणे चुकीचे
तसेच पुढे बोलताना, सरकार संविधानानुसार काम करीत नाही. ज्या प्रकारचे कायदे आणि कायदा दुरुस्ती सरकार करीत आहे ते कुठेच संविधानाच्या नियमांमध्ये बसत नाहीत. जेव्हा राज्यपाल याकडे लक्ष वेधता, तेव्हा त्यांचा अपमान केला जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंही फडणवीस म्हणाले.