Breaking News

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचतर्फे महिला पत्रकारांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने रविवारी (दि. 7) महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा येथील शासकीय विश्रामगृहात झाला.

यामध्ये दैनिक रामप्रहरच्या उपसंपादिका तन्वी गायकवाड, मल्हार टिव्हीच्या वृत्त निवेदिका मेधावी घोडके, क्षितीज पर्वच्या उपसंपादिका सुमेधा लिम्हण, दैनिक किल्ले रायगडच्या डेस्कची जबाबदारी यशस्वीपणे हाताळणार्‍या ज्योती सातारकर, कर्नाळा टीव्हीच्या उपसंपादिका चेतना गावंड वावेकर, साम टिव्ही कर्नाळा टिव्ही अशा वृत्तसंस्थांमध्ये आपल्या प्रभावी अँकरचा ठसा उमटवल्यानंतर सध्या फ्रीलान्सर म्हणून कार्यरत असणार्‍या तृप्ती पालकर, नूतन पाटील यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्तींचा शाल, सन्मानपत्र, वाचनीय पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, दैनंदिनी आणि हॅन्ड सॅनीटायझर देऊन गौरव करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि हॅन्ड सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव मंदार दोंदे यांनी तर अध्यक्ष माधव पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.  प्रवीण मोहोकर यांनी सूत्रसंचालन केले व दिपक घोसाळकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे उपाध्यक्ष हरेश साठे, विवेक मोरेश्वर पाटील, संजय कदम, अनिल कुरघोडे, राजू गाडे, सुनील राठोड, दत्ता मोकल आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply