Breaking News

पॉवर लिफ्टिंगमध्ये खोपोलीतील विनायक पाटीलला सुवर्णपदक

खोपोली ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने मुंबई प्रभादेवी येथे सब जूनियर, सीनियर, मास्टर मुले-मुली यांची विविध गटांत स्पर्धा घेण्यात आली होती. यातील 66 वजनी गटात खोपोलीतील महिंद्रा सानयो कंपनीतील कामगार विनायक पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल नुकतेच त्याचा कंपनीचे वरिष्ठ संचालक अविनाश सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ युनियनचे स्थानिक अध्यक्ष रवींद्र कांबळे  तसेच नितीन मोरे, प्रभाकर पाटील, संदेश पाटील ,रणजीत सिंग आदी सदस्य उपस्थित होते. दरम्यान, केरळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विनायक पाटील याची निवड करण्यात आली आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply