Breaking News

रायगड जिल्हा आता मासमुक्त; आदेश जारी

अलिबाग ः विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करू नका, असे आदेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे विनामास्क जिल्ह्यात फिरत असल्यास आता पोलीस तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. रायगड जिल्हा मासमुक्त झाला असून रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विनामास्क फिरणार्‍यावर कारवाई करू नका, असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विनामास्क केसेस बंद करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने आता रायगड पोलीस हद्दीत विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केसेस करू नका, असे पत्र सर्व पोलीस ठाण्यांत आणि वाहतूक शाखांना देण्यात आले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply