मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली आदीवासीवाडीच्या डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा बेवारस अड्डा उद्ध्वस्त केला आहे.
यात 200 लिटर क्षमतेचे तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेल्या रसायनाने भरलेले पाच प्लास्टिकचे ड्रममध्ये व 200 लिटर क्षमतेच्या पाच पत्र्याच्या टाक्या असे एकूण 2000 लिटर रसायन मिळून आले. हे रसायन जागीच ओतून नाश करून पाच प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट केले व पाच पत्र्याच्या टाक्या तोडून नुकसान केले आहे. वाशिवली आदिवासी डोंगराळ भागातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करण्याची ही बारावी घटना आहे.