Breaking News

होळी सणानिमित्त विशेष ट्रेन

पनवेल : रामप्रहर वृत्त

होळी सणानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनांने प्रवासी संघ, पनवेलच्या लेखी निवेदन व चर्चेद्वारे प्रवासी चाकरमानी कोकणी बांधवांच्या मागणीप्रमाणे विशेष प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहेत. याची आरक्षण व्यवस्था 10 मार्चपासून सर्व संगणक आरक्षण केंद्रावर आणि या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन मुंबई, पनवेल शहर व ग्रामीण भाग, रायगड जिल्हा मधील प्रवाशांची गर्दीतून सुटका होऊन प्रवास आरमशीर, आनंदाने, उत्साहाने होळीचा सणा साजरा करण्याचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रेल्वे सेवांचा चाकरमानी कोकणी प्रवासी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, कार्यवाह व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट, सह सचिव निलेश जोशी, प्रवासी संघातर्फे सर्व चाकरमानी कोंकणी प्रवासी बांधवांना होळी पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वेळापत्रक

1) ट्रेन नं. 1011/12 पुणे-करमाळी-पुणे (विशेष सेवा) (4) फेर्‍या

ट्रेन क्र. 01011- 11 मार्च आणि 18 मार्च पुणे स्थानकामधून 17ः30.सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 8 वाजता करमाळीला पोहचेल.

ट्रेन क्र. 01012- 13 मार्च, 20 मार्च रोजी करमाळी स्थानकामधून 9.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.35 वाजता पुण्याला पोहचेल.

रेल्वे स्थानक थांबे-व्हाया कल्याण-पनवेल-मार्गे

लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवळी, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी

संरचना- (कोच पोझिशन)

  1. द्वितीय वातानुकुलीत, 4 तृतीय वातानुकुलीत, 11-शयनयान, 6-द्वितीय आसन

2) ट्रेन नं. 01013/14- पनवेल-करमाळी-पनवेल(विशेष सेवा) (4 फेर्‍या)

ट्रेन क्र. 01013- 12 मार्च आणि 19 मार्च रोजी पनवेल स्थानकामधून रात्री 22.00 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 8.00 वाजता करमाळीला पोहचेल.

ट्रेन क्र. 01014- 12 मार्च अणि 19 मार्च रोजी करमाळी स्थानकामधून  9ः20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे 20.00 वाजता पोहचेल.

रेल्वे स्थानक थांबे ः- रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply