Breaking News

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का?

भाजप नेते आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार फूट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले. ठाकरे सरकारला गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहित नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत. कोणीही न मागता बार, पबना रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार! सरकार नशा बहाद्दरांचे आहे की, उत्सव प्रेमींचे? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

काय आहेत राज्य सरकारचे निर्देश

भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. माघी गणेशोत्सव 15 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप कोरोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. माघी गणेशोत्सव 15 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप कोरोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे. विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply