Breaking News

आजपासून रंगणार प्रतिष्ठेची डब्ल्यूटीसी फायनल

साउथँप्टन ः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना शुक्रवार (दि. 18)पासून सुरू होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाऊल मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय संघात रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्याकडे सलामीची जबाबदारी असेल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे व यष्टीरक्षक रिषभ पंत मधली फळी सांभाळतील. वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा व इशांत शर्मा यांच्याकडे आहे, तर रवींद्र जडेजा व आर. अश्विन हे फिरकी गोलंदाजही संघात आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळविण्यात आले. यात भारताने 21 सामन्यांत आणि न्यूझीलंडने 12 सामन्यांत विजय मिळविला, तर 26 सामने अनिर्णीत राहिले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply