Breaking News

खान्देश रहिवासी संघातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम

पनवेल ः वार्ताहर

महिला दिनाचे औचित्य साधत खारघर येथील खान्देश रहिवासी संघाने महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सचिव चित्रा बाविस्कर आणि तृतीयपंथी विकी शिंदे यांनी हजेरी लावली. व्यासपीठावर त्यांच्यासह  खान्देश रहिवासी संघाचे अध्यक्ष मधु पाटील आणि महिला अध्यक्ष रीना पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 23 महिलांना चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. महिलांसाठी काम करणार्‍या खारघरमधील 50 हून अधिक विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, बचतगट, ट्रस्ट, फाउंडेशनच्या महिला अध्यक्षांना गौरविण्यात आले. तसेच महिला डॉक्टर, युक्रेनवरुन परतलेल्या खारघरच्या समीक्षा शिरसाठ हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी रक्तदान शिबिरही पार पडले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply