Breaking News

पनवेलमध्ये नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वस्थ व नशामुक्त भारतासाठी तरुणाईचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी या शीर्षकाखाली रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये नमो युवा रनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो युवक-युवतींनी आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात सहभागी तरुणाईने ’फिट इंडिया’चा नारा देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहचविला. पनवेल शहरातील सुंदर अशा वडाळे तलाव येथून तीन किलोमीटर अंतराच्या या नमो युवा रनचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3चे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, राजेश भगत, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनेश ढवळे, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, सोशल मीडिया संयोजक सुशील शर्मा, जगदिश घरत, अमित ओझे, अभिषेक पटवर्धन, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रूपेश नागवेकर, प्रशांत मोरबाळे, विनेश कदम, अशोक साळुंखे, चिन्मय समेळ, अक्षय सिंग, मयूर कदम, तेजस जाधव, नितेश पाटील, देवांशू प्रभाळे, कोमल कोळी, शिवानी घरत यांच्यासह पदाधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व धावपटूंचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला तसेच या उपक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नशामुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आल्याचे मान्यवरांनी नमूद केले. युवक, युवती आणि महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात व लक्षणीय होती. या वेळी आयोजकांकडून स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात आले. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उत्साह, आनंद आणि सामूहिक ताळमेल यावर आधारित झुम्बा आयोजित करण्यात आले होते.
नमो युवा रन अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि यशस्वी वातावरणात पार पडली, त्यामुळे हा उपक्रम युवकांमध्ये आरोग्य, क्रीडाभावना, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्त जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या नमो युवा रनमध्ये पुरुषांच्या गटात राज भगत यांनी प्रथम, सुहास माळी यांनी द्वितीय आणि विकास ठिकडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला; तर महिलांच्या गटात प्रथम क्रमांक जान्हवी चोगले, द्वितीय क्रमांक प्रथमा भगत आणि तृतीय क्रमांक काजळ प्रजापती यांनी पटकावला.

देशाचे लोकप्रिय व कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजींनी देशाला ‘फिट इंडिया’ आणि ‘ड्रग फ्री इंडिया’कडे नेण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आजच्या युवकांनी समाजाला योग्य दिशा देणे हे आपले कर्तव्य आहे. नमो युवा रन हा त्याच उद्दिष्टाचा भाग आहे.
-आनंद ढवळे, अध्यक्ष, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply