Breaking News

रसायनी, चिरनेरमध्ये वणव्याचा भडका

वाढत्या उष्णतेने वणव्याचे प्रमाणही वाढले; दहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

उरण, पनवेल : प्रतिनिधी

रसायनी व चिरनेर परिसरातील डोंगरांवर वाढत्या उष्णतेच्या पार्‍यामुळे  वणवा पेटला होता.

चिरनेरच्या बापूजी देव डोंगर परिसरात मंगळवारी (दि.15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास वणवा पेटला. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. गेल्या 3 दिवसांपासून लाडिवली डोंगर ते घेरावडी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. मात्र फ्रेंड्स ऑफ नेचर आणि आपटा गुळसुंदे वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी हा वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेे.

चिरनेर बापूजीदेव परिसरातील डोंगराला उन्हाचा पारा चढल्याने आग लागली. रणरणत्या उन्हाच्या तडाख्याने आग चांगलीच भडकली. या भडकलेल्या वणव्यात लाखो वन्यजीवांची हानी झाली आहे. वनकर्मचारी इंगोळे, पवार, शीतल आणि वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, सदस्य काशिनाथ खारपाटील, महेश भोईर, मनोहर फुंडेकर, महेश मिरगे, राजेश पाटील आदींनी भडकलेला वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मंगळवारी (दि.15) दुपारी लागलेला वणवा तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून लाडिवली डोंगर ते घेरावडी परिसराला वणवा लागल्याचे लक्षात येताच फ्रेंड्स ऑफ नेचरचे प्रथमेश मोकल यांनी आपटा गुळसुंदे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आडे यांना याबाबत माहिती दिली. घेरावाडी परिसरात आडे आपल्या वनकर्मचार्‍यांसोबत काम करीत होते. तर फ्रेंड्स ऑफ नेचरचे प्रथमेश मोकल, नरेश मोरे व तुषार कांबळे शर्थीचे प्रयत्न करीत केले.

वणवा विझवण्यासाठी लोकसहभागाची गरज

वणवा विझविणे हे केवळी वनखात्याचे काम नाही तर तेथील नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. या वणव्यात अनेक प्राणी, पक्षांसह औषधी वनस्पतीही नष्ट होत आहेत. आपली जंगले म्हणजे आपली फुफ्फुसे आहेत. यामुळेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनखात्यासोबत जाऊन वणवा विझवा, असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचरतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply