कर्जत : बातमीदार : भारतीय जनता पक्षाचा संघटन स्थापना दिवस निमित्त शनिवारी (दि. 6) कर्जत तालुका भाजप कार्यालयात मान्यवरांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. भाजप संघटन स्थापना दिनानिमित्त कर्जत तालुका पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची स्थापना करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या दोन्ही नेत्यांच्या कार्याची उजळणी पक्षाच्या तालुका कार्यालयात जमलेल्या कार्यकर्ते यांच्यासमोर घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी दोन्ही नेत्यांचे गौरव करणारी भाषणे केली. त्या वेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, भाजप तालुका कार्यालय चिटणीस परशुराम म्हसे, भाजप किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक पवार, रमाकांत जाधव, गुप्ता आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …