Breaking News

आज चवदार तळे क्रांती दिन सोहळा; भीमसागर उसळणार

महाड ः प्रतिनिधी

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन रविवारी (दि. 20) आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. राजेंद्रपाल गौतम व राज्यमंत्री रामदास आठवले या वेळी उपस्थित राहणार आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळे येथे सामाजिक क्रांती केली. तमाम दलित, शोषित, पीडित आणि तळागाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरिता चवदार तळे येथे डॉ. आंबेडकरांनी सत्याग्रह केला. त्याचा वर्धापन दिन दरवर्षी महाड क्रांतीभूमीत साजरा केला जातो.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply