Breaking News

मुरूडकर शिवप्रेमींनी किल्ले रायगडावरून आणली शिवज्योत यात्रा

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यांतील खारआंबोली येथील श्री शिवप्रेमी मित्र मंडळातील तब्बल 150 शिवभक्तांनी  किल्ले रायगडावरील जगदिश्वर मंदिरापासून रविवारी मध्यरात्री पायी शिवज्योत यात्रा काढली, ती सोमवारी (दि. 21)  सकाळी 10  वाजता मिठागर येथे पोचली. तेथून भालगाव,  सावली, जमृतखार, आगरदांडा, नांदले, खार अंबोली मार्गे या शिवज्योत यात्रेचे दुपारी 12 वाजता मुरूड शहरात आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले. या वेळ शिव आरती, फुलांची उधळण करण्यात आली. या शिवज्योत यात्रेदरम्यान, मुरूड नगरपालिका कार्यालय, दत्तवाडी शिवाजी चौक, अलकापुरी येथील शिवपुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला. खार आंबोली येथे या शिवज्योत यात्रेचा समारोप करण्यात आला. तालुक्यातील खारअंबोली येथील चिंतामण बेडेकर, दिनेश गोसावी, संदेश म्हात्रे, गणेश गोसावी, संकेत आर्कशी यांच्यासह अनेक शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply