पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धोंडपाडा येथे 14 ते 21 मार्चपर्यंत तुकाराम बीज उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या काळात रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. यावेळी मंदिर परिसरात मिठाई, खेळण्याची दुकाने, साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. सोमवारी (दि. 21) सकाळी हभप सतीश महाराज डोईफोडे (सिंदखेडराजा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या तुकाराम बीज उत्सवाची सांगता झाली.