Breaking News

उरण येथे शिवकालीन शस्त्र, दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन

उरण ः वार्ताहर

मी उरणकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र व दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन सोमवारी (दि. 21) येथे भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला म्हाडा माजी सभापती राज्यमंत्री दर्जा बाळसाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. तर नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य महेंद्र पाटील, नगरसेवक रवि भोईर, गटनेते भाजप तालुकाध्यक्ष कौशिक शहा, भाजप माजी पनवेल तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, वंजारी समाज जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, नगरसेवक राजेश ठाकूर, उरण भाजप युवक योगेश म्हात्रे, विजय साठे, मी उरणकर संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर, सदस्य विकास पाटेकर, बादल म्हात्रे, सनी पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रदर्शनात सुमारे 24 पॅनल आहेत. या शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणी यांची माहिती संग्राहक ठाणे येथील जोसेफ लोपीस यांनी स्वतः नागरिकांना दिली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply