Breaking News

कर्जतमध्ये 101 वर्षीय आजीकडून मतदान

कर्जत : बातमीदार

कर्जत विधानसभा मतदारसंघातील जिते येथील मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) 101 वर्षीय आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी  मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी अपघातात दोन्ही पाय निकामी झालेले कशेळे येथील संजय दाभणे यांनीही मतदान केले.  जिते येथील आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी आपला मुलगा मारुती यांच्यासह मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. या आजी व्हीलचेअरवर मतदान केंद्रावर आल्या होत्या. त्या वेळी मतदान केंद्रामध्ये किमान 100हून अधिक मतदार रांगेत उभे होते, पण त्या सर्वांनी आजीबाईंना पुढे वाट दिली. कशेळे येथील संजय दाभणे यांचे दोन्ही पाय मागील महिन्यात झालेल्या अपघातात मोडले आहेत. दोन्ही पायांना प्लास्टर असूनदेखील ते मतदान करण्यासाठी गावाबाहेर असलेल्या मतदान केंद्रावर पोहचले आणि त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply