उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील करंजा सुरकीचापाडा येथील रहिवासी ओमकार सदानंद कोळी यांनी धुळे स्नेहानगर येथे झालेल्या दुसर्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पाच सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीमुळे केरळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
ओमकारने 100, 200 व 400 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर मिडल रिले आणि 200 मीटर फ्री स्टाईल रिले अशी पाच सुवर्णपदके पटकाविली. या सुवर्णपचंकाबद्दल विविध स्तरातून, क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मित्र परिवार, नातेवाईक, चाहत्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचे कौतुक केले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …