Breaking News

रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण

गुन्हा दाखल होईपर्यंत डॉक्टरांचे काम बंद

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण  केली. या मारहाणीनंतर मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत. अलिबाग पोलिसांकडून डॉक्टर मारहाणीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर हे आंदोलन मागे घेतले जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिला 25 जून रोजी दाखल झाली होती. महिलेची प्रसूती झाल्यानंतर टाके घालण्यात आले नव्हते. याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. पांडकर यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पांडकर हे दुसर्‍या महिला रुग्णाचे सिजरिंगची शस्त्रक्रिया करत होते. दोन तास झाले तरी प्रसुती पश्चात टाके घातले गेले नाही. रुग्णाला तात्काळ बघितले गेले नाही, याचा राग मनात धरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. पांडकर यांना रुग्णालयातच मारहाण केली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply