Breaking News

शहीद दिनानिमित्त ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन

मुरूड : प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन करंदेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि. 23) शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली वाहण्यात आली.करंदेकर त्यांच्या निवासस्थानी सलग 40 वर्षापासून शहिद दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. करंदेकर दाम्पत्य दिवसभर निर्जळी उपवास पाळून शहीद दिन साजरा करतात. बुधवारी सकाळी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह मंगल पांडे, मादाम कामा, चंद्रशेखर, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, अनंत कान्हेरे, भाई कोतवाल आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी तहसीलदार रोहन शिंदे, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, मोहन करंदेकर, राष्टपती पारितोषिक प्राप्त अजित कारभारी, चिंतामणी मकू, सुरेंद्र मकु, वासंती उमरोटकर, राजेश गुप्ते, प्रशांत आबुंर्ले, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव आदी मान्यवरांनी क्रांतीकारकांना अभिवादन केले.

रोहे : धाटाव येथील एम. बी. मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात बुधवारी (दि. 23) शहीद दिन साजरा करण्यात आला. शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुण्यतिथीचा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या सोनाली कदम, जुईली देशमुख, वृषाली टिकोणे, मयुरी अंबृस्कर, भाविका  बिरवाडकर,  पलक भालेकर, दिव्या नाकते या विद्यार्थिनींनी रांगोळी काढून शहिदांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न म्हसळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निकिता महाडिक, प्रा. मयुरी वानखेडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कर्जत : येथील नगर परिषदेतर्फे बुधवारी (दि. 23) शहिदांना अभिवादन करण्यात आले. 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून ओळखला जातो. कर्जत नगर परिषद कार्यालयात बुधवारी शहीद सुखदेव, शहीद राजगुरू, शहीद भगत सिंग यांच्या प्रतिमांना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळींबकर, सोमनाथ ठोबरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, कर्मचारी सारिका कुंभार, विभावरी म्हामूणकर, शेखर लोहकरे या वेळी  उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply