Breaking News

पनवेल पालिकेच्या 1956साली बांधलेल्या शाळेच्या नूतनीकरणाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल शहरातील महानगरपालिकेच्या 1956मध्ये बांधलेल्या शाळेच्या जागी 8.34 कोटी रुपये खर्चून अद्यावत नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्याच्या कामाला गुरुवारी (दि. 2) सुरुवात करण्यात आली.  सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आल्याचे दिसत आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत 1956मध्ये सुरू झालेल्या शाळा क्रमांक 3ची इमारत मोडकळीस आल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी नवीन अद्यावत इमारत बांधावी म्हणून महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांना प्रस्ताव तयार करून मंजुरी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार 8 कोटी 34 लाख रुपयांचा तीन मजली इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आचारसंहिता

लागण्यापूर्वी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.

त्यानंतर आचारसंहिता लागल्याने कामाला सुरुवात झाली नव्हती. मे. आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. बोरिवली यांनी हे काम घेतले असून, 2.958 स्क्वे. फुटाचे तळमजला अधिक तीन मजले बांधण्यात येणार आहेत. यामध्ये वाहनतळ, क्लासरूम, मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफ रूम, अडिओ व्हिसल आणि संगणक रूम असणार आहे. सदर बांधकाम हे धरणीकंप प्रतिबंधक आहे. आग प्रतिबंधक

उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. या शाळेची जुनी इमारत पाडण्याच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply