पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या 102व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 4) सातारा वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्चला (केबीपीआयएमएसआर)सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते अंतिम वर्षातील कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोना काळात इन्स्टिट्यूटने केलेल्या कामाचे या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले तसेच गतवर्षी संशोधन व पेटंट नोंदणी केल्याबद्दल डॉ. सारंग भोला यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कॉपीराईटबद्दल डॉ. राजेंद्र कुंभार व संशोधन पेपर प्रकाशित केल्याबद्दल डॉ. शिवराज निकम तसेच संशोधन, कॉपीराईट व पेटंट नोंदणीसाठी सहकारी प्राध्यापकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बापूसाहेब सावंत यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरबर त्यांनी इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले आणि इन्स्टिट्यूटच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली
उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …