पेण : प्रतिनिधी
पेण चिंचपाडा येथील एका सुपरमार्केटमध्ये पाकिस्तानात उत्पादित झालेले सरबत विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तसेच अन्न भेसळ कार्यालयात केली आहे.
पाकिस्तानात उत्पादित वस्तुंची सदर सुपर मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे समजल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी, त्यांचे मित्र स्वरूप घोसाळकर यांना ही वस्तू विकत घ्यायला सांगितली. ठरल्याप्रमाणे स्वरूप घोसाळकर यांनी ती वस्तू रीतसर पावती घेऊन खरेदी केली. व पेण पोलीस ठाणे आणि अन्न भेसळ कार्यालयात तक्रार दाखल केली.
दरम्यान, पाकिस्तानात तयार झालेले उत्पादन पेणमधील सुपर मार्केट मालकाने विकणे बेकायदेशीर असून, सदर मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ही वस्तू कशाप्रकारे भारतात आली याचा शोध घ्यावा, अशा प्रकारचा अर्ज राजेंद्र पाटील यांनी अन्न प्रशासन अधिकार्यांना दिला आहे.
पाकिस्तानी बनावटीच्या सरबतावर भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याने विक्रेत्यावर कारवाई करता येत नाही. मात्र या सरबताचे नमुने आम्ही घेतले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
-दिलीप संगत, अधिकारी, अन्न प्रशासन कार्यालय, पेण