मिरचीचे दर मात्र अद्यापही चढेच
कर्जत ः प्रतिनिधी
मार्चअखेर मिरची वगळता सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असताना भाज्यांचे दरही चढे असल्याने नाराजी व्यक्त होत होती, मात्र आता भाज्यांचे दर घटल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मध्यंतरी भाज्यांचे भाव खूप वाढले होते. त्यामुळे दररोज भाजी करताना गृहिणींचे बजेट कोसळत होते. महागाईनेदखील उच्चांक गाठल्याने माध्यमवर्गीयांसह गरीब जनता मेटाकुटीस आली आहे. भाज्या, मच्छी, चिकन, मटण सगळ्याचेच दर वाढल्याने आता खायचे तरी काय, असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे, मात्र आता भाज्यांचे दर घटल्याने काही प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन महिन्यांत भाज्यांचे दर कडाडले होते. त्यामुळे कुटुंबाचे बजेट बिघडले होते. आता दर उतरल्यामुळे भाज्या खाण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्य भाज्यांचे दर उतरलेत. मात्र मिरची खूपच तिखट झाली आहे.
-मीना प्रभावळकर, निवृत्त मुख्याध्यापिका
आम्ही नेहमीच भाज्या खात असल्याने दर कितीही वाढले तरी नाईलाजास्तव भाज्या विकत घ्याव्या लागतात. आता दर कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
-संतोष ओसवाल, गृहिणी
भाजीचे दर (प्रति किलो) फेब्रुवारी मार्च
टोमॅटो 40 रु. 20 रु.
कोबी 80 रु. 40 रु.
फ्लॉवर 80 रु. 40 रु.
भोपळी मिरची 160 रु. 100 रु.
मटार 40 रु. 70 रु.
फरसबी 100 रु. 80 रु.
गाजर 50 रु. 40 रु.
भेंडी 80 रु. 40 रु.
वांगी 80 रु. 40 रु.
घेवडा 120 रु. 40 रु.
काकडी 50 रु. 40 रु.