Breaking News

मुरूड नांदगावचे अनिरुद्ध खेडेकर यांची रांगोळी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

मुरूड : प्रतिनिधी

नांदगावचा रंगावलीकार अनिरुध्द संदिप खेडेकर यांनी साकारलेली जगातील सर्वात लहान अंडर वॉटर पोर्ट्रेट रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अनिरुध्द खेडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची चार बाय चार से.मी.आकाराची रांगोळी 17  मार्च 2021 रोजी 36 मिनिटे 39 सेकंद या वेळेत पाण्याखाली काढून विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. ही रांगोळी साकारण्यासाठी सतिश जोशी, जयंत शिगवण, अक्षय शहापूरकर आदिंनी अनिरुध्द यांना मोलाची मदत व मार्गदर्शन केले. या अंडर वॉटर पोर्ट्रेट रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याद्दल अनिरुध्द खेडेकर यांच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply