पनेवल ः रामप्रहर वृत्त
वलप ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना राजेश पाटील यांच्यामार्फत तिर्थयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र गेल्या महिन्यापासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने मंदिरे खुली झाली आहेत. त्याअनुषंगाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणारे वलप गावातील राजेश पाटील यांच्या आयोजनातून तसेच वलप ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योत्स्ना पाटील व सदस्य नवनाथ खुटारकर यांच्यामार्फत तिर्थयात्रेचे 26 व 27 मार्चदरम्यान आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तश्रुंगी माता, शिर्डी, शनि-शिंगणापुर, रेणुकामाता मंदिर, नेवासा यांसारख्या त्रिर्थक्षेत्रांचे दर्शन देण्यात आले. यात्रेमध्ये वलप गावाधील महिला मंडळ, ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला. यात्रेचे आयोजन केल्याबद्दल राजेश पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.